Breaking News

स्मिथच्या जवळ पोहोचला विराट, अश्‍विन-रहाणेलाही फायदा

दुबई
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या टेस्टमध्ये भारताचा दणदणीत विजय झाला. याचबरोबर भारताने 3 टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये 2-0ने विजयी आघाडी घेतली आहे. याचा परिणाम टीम इंडियाच्या खेळाडूंच्या क्रमवारीवरही झाला आहे. विशाखापट्टणम टेस्टमध्ये केलेल्या दमदार कामगिरीमुळे अश्‍विन 10व्या क्रमांकावर पोहोचला होता. पुण्यात झालेल्या दुसर्‍या टेस्टनंतर अश्‍विन 7व्या क्रमांकावर आला आहे. अश्‍विनशिवाय टॉप-10 बॉलरमध्ये भारताचा जसप्रीत बुमराह आहे. पण दुखापतीमुळे बुमराह या टेस्ट सीरिजमधून बाहेर आहे.

भारतीय टेस्ट टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेचाही क्रमवारीत फायदा झाला आङे. रहाणेने दुसर्‍या टेस्टमध्ये 59 रनची खेळी केली होती. विराटसोबत रहाणेने 178 रनची पार्टनरशीप केली होती. आता रहाणे 9व्या क्रमांकावर आहे.

पुणे टेस्टमध्ये टेस्ट क्रिकेटमधलं 7वं द्विशतक करणारा विराट कोहली स्टीव्ह स्मिथपेक्षा एक रेटिंग पॉईंट मागे आहे. आधी या दोघांमध्ये 25 पॉईंटचा फरक होता. स्मिथ पहिल्या क्रमांकावर आणि कोहली दुसर्‍या क्रमांकावर कायम आहे. कोहली आणि रहाणेशिवाय चेतेश्‍वर पुजारा चौथ्या क्रमांकावर आहे.