Breaking News

पात्रता फेरीचे यजमानपद भारताकडे

BFI
मुंबई/प्रतिनिधी
भारतात पुढील वर्षी मार्च महिन्यात टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठीच्या 3 बाय 3 बास्केटबॉल पात्रता फेरीचे आयोजन केले जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघाने (फिबा) याविषयीची घोषणा मंगळवारी केली. या स्पर्धेसाठी पुरुषांचे 20 आणि महिलांचे 20 संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेच्या ठिकाणाची घोषणा नंतर केली जाणार आहे. भारतीय बास्केटबॉल महासंघाच्या (बीएफआय) सहकार्याने आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल महासंघ (फिबा) या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. ‘फिबा’ 3 बाय 3 ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेद्वारे पुरुष आणि महिलांमध्ये प्रत्येकी तीन संघांना टोक्यो ऑलिम्पिकचे स्थान निश्‍चित करता येणार आहे.
ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच 3 बाय 3 बास्केटबॉल प्रकाराचा समावेश करण्यात आला असून पुरुष आणि महिलांमध्ये प्रत्येकी आठ संघ सहभागी होणार आहेत. संयोजक म्हणून भारताला थेट प्रवेश मिळणार असून अन्य संघांची निवड ‘फिबा’ 3 बाय 3 महासंघाच्या क्रमवारीनुसार केली जाईल.