Breaking News

जय हिंद आश्रम शाळेस लोहे ट्रस्टची मदत

संगमनेर/प्रतिनिधी
कोळवाडेच्या जयहिंद आदिवासी आश्रम शाळेसाठी कस्तुरचंद लोहे ट्रस्टमार्फत वाचन संस्कृती वृद्धीगत व्हावी, यासाठी रुपये 1 लाख किमतीची पुस्तके भेट दिली. अशी माहिती आदिवासी आश्रम शाळेचे प्राचार्य दशरथ वर्पे यांनी दिली.
महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी प्रथितयश अ‍ॅड.योती मालपाणी, किरण झवर, पुष्पा निर्हाळी, नीलिमा छत्रिय, प्रा.बाबा खरात, काशिनाथ गोंदे, सरपंच जयश्री कुदळ उपस्थित होते.
 याप्रसंगी लोहे ट्रस्टच्या विश्‍वस्त किरण झवर म्हणाल्या की, आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, वाचना -ाानात भर पडते, वैचारिक परिपक्वता वाढते, यासाठी आदिवासी क्षेत्रातील गुणात्मक आश्रम शाळा म्हणून कोळवाडेच्या जय हिंद आश्रम शाळेची निवड केली आहे.
अ‍ॅड.योती मालपाणी म्हणाल्या की, महात्मा गांधींचे खरे स्वप्न कोळवाडेच्या आश्रमशाळेत साकार केले जात आहे. स्वच्छता, मूल्यशिक्षण, संस्कार, संस्कृती संवर्धन, लोककला यांचे जतन केले जात आहे. याचा आवर्जून उल्लेख केला. या प्रसंगी आदिवासी सेवक प्राध्यापक बाबा खरात, नीलमा क्षत्रिय, पुष्पा निराळी यांचीही मनोगते झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दशरथ वर्पे यांनी व सूत्रसंचालन अविनाश दिघे यांनी केले.