Breaking News

पाथर्डी तालुक्यात जोरदार पाऊस

पाथर्डी/प्रतिनिधी
तालुक्यातील पूर्व भागातील चिंचपूर ईजदे, कुत्तरवाडी यासह परिसरातील विविध गावात आज दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने नद्यांना मोठे पाणी आले आहे.तसेच शहरातही दिवसभर रिमझिम चालू होती.
तालुक्यातील चिंचपूर ईजदे, चिंचपूर पांगुळ, पिंपळगाव टप्पा, करोडी, तिनखडी यासह परिसरातील विविध गावात आज दुपारी चांगलाच जोराचा पाऊस झाला. सध्या बाजरी काढणीचे दिवस चालू असून या पावसामुळे शेतकर्‍यांचे काही प्रमाणात नुकसान झाले. मात्र, नुकसानी विचार न करता पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. कुत्तरवाडी परिसरात झालेल्या पावसामुळे त्या खालील टाकळीमानूरच्या नद्यांना आज मोठा पूर आला होता. नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी नदीच्या कडेला मोठी गर्दी केली होती. दरम्यान, तालुक्यातील पूर्व भागात जरी चांगला पाऊस झाला असला तरी पश्‍चिम भागात अजूनही शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.