Breaking News

प्राथमिक विद्यामंदिरात कॉ. आबासाहेब काकडे यांची पुण्यतीथी साजरी

शेवगाव/प्रतिनिधी
 एफ.डी. एल.प्राथमिक विद्यामंदिर निर्मलनगर शेवगाव या ठिकाणी कॉ. आबासाहेब काकडे यांचे 41 वे पुण्यस्मरण साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजयराव वराडे हे होते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका पटेल मॅडम यांनी प्रास्ताविक मांडले. कार्यक्रमच्या वेळी विध्यार्थ्यांची भाषणे झाली. शाळेतील शिक्षक आव्हाड यांनी मनोगतात कॉ.आबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजीक व राजकीय कार्यातून समाजाने प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच अध्यक्ष डॉ. वराडे यांनी आदर्श जीवन घडविण्याकरिता निरोगी राहणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कॉ.आबासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. शाळेचे निरीक्षक शिंदे गुरुजी यांनी वसतिगृहातील त्यांचे अनुभव व त्यांच्या सहवासातूनच आदर्श जीवन घडविल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमच्या वेळीबहुसंख्येने माता पालक तसेच सर्व शिक्षकवृद उपस्थित होते. यावेळी सुञसंचालन रामदास पांढरे यांनी केले. तर समारोप दिलीप आव्हाड यांनी केले.