Breaking News

सारडा विद्यालयात ‘स्वच्छता दिनी’ विविध उपक्रमांचे आयोजन

अहमदनगर/प्रतिनिधी
 हिंद सेवा मंडळाच्या सीताराम सारडा विद्यालयात महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त स्वच्छता सप्ताह, तंबाखूमुक्त शाळा, चित्रकला स्पर्धा, वर्ग सजावट स्पर्धा, आरोग्य तपासणी, वैयक्तिक स्वच्छतेविषयी प्रबोधन आदी उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी विद्यालयाचे चेअरमन प्रा.मकरंद खेर, मुख्याध्यापक दीपक कुलकर्णी, पर्यवेक्षक लहू घंगाळ आदी उपस्थित होते. डॉ.आनंद पठारे, डॉ.फिरोदिया, डॉ. पारगावकर, सुजाता काळे यांनी विद्यार्थिनींना  वैयक्तिक स्वच्छतेची माहिती दिली.  उपक्रमात वर्गशिक्षक, शिक्षक विलास साठे, सुनील कुलकर्णी, अशेाक डोळसे, अमोल कदम आदींनी सहभाग घेतला.