Breaking News

ट्रेलरच्या धडकेत तीन वर्षाच्या मुलीसह शिक्षीकेचा मृत्यू

ठाणे
मोटारसायकला ट्रेलरने दिलेल्या जोरदार धडकेत शिक्षिकेसह तिच्या तीन वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . गुरुवारी रात्री घोडबंदर रोडवरील भाईंदरपाडा येथे हा

अपघात घडला असून पळून चाललेल्या ट्रेलर चालकाला लोकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
ब्रम्हांड फेज सातमध्ये राहणारे दिलीप विश्वकर्मा खासगी कंपनीत काम करतात. पत्नी चंद्रावती (३१) खासगी शाळेत शिक्षिका आहे. पत्नी मुलगी प्रांजल हिला घेऊन मिरारोडला माहेरी गेली होती. गुरुवारी रात्री कामावरुन सुटल्यानंतर दिलीप पत्नी आणि मुलीला आणण्यासाठी मिरारोडला गेले होते. रात्री १०.३० वाजता मोटारसायकलवरुन विश्वकर्मा कुटुंब घरी येत असताना ट्रेलरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. तिघेही उजव्या बाजूला रस्त्यावर पडले. यावेळी ट्रेलरखाली चिरडून चंद्रावती हिचा जागीच मृत्यू झाला तर प्रांजल गंभीर जखमी झाली. दिलीप विश्वकर्मा हे किरकोळ जखमी झाले.
गंभीर जखमी झालेली तीन वर्षाची प्रांजल हिला रूग्णालयात दाखल केले. मात्र तीचाही मृत्यू झाला. पळून गेलेला ट्रेलरचालक चंद्रशेखर बिष्णोई याला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केले. कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात दिलीप हेही जखमी झाले आहेत.