Breaking News

सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू - उद्धव ठाकरे

Uddhav Thakare
मुंबई
’विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेनेचा पारंपरीक दसरा मेळावा झाला. राज्यातील कानाकोपर्‍यातून शिवसैनिक या दसरा मेळाव्यासाठी शिवाजीपार्कवर जमले होते. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. जोपर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी यांच धोरण बदलत नाही तोपर्यंत तेच माझ्य टार्गेटवर राहतील असंही ते म्हणाले. भाजपला पाठिंबा देण्याशीवाय दुसरा काय पर्याय होता. 370 कलमाचं समर्थन करणार्‍या काँग्रेस-राष्ट्रवादीला समर्थन द्यायचं काय असा सवालही त्यांनी केला. उद्धव ठाकरे म्हणाले, विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजा करायची असते, माझी शस्त्र ही माझ्या समोर महाराष्ट्रभर पसरलेली आहेत आणि तुमच्या सगळ्यांचं पूजन करून मी याच महिन्यात असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत विधानसभेवर भगवा फडकवायला निघालो आहे. आजही आम्ही ठाम आहोत, विशेष कायदा करा आणि अयोध्येत रामजन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधा ही आजही शिवसेनेची मागणी आहे असंही ते म्हणाले.

’चंद्रकांत पाटील बोलले होते आमची अडचण समजून घ्या, अही तुमची अडचण समजून घेतली. तुम्ही आता महाराष्ट्राची अडचण सोडवा, आम्ही आहोत तुमच्यासोबत. सत्ता तर मला पाहिजेच, कोणत्याही परिस्थितीत पाहिजे. अगदी आमच्या देशावर प्रेम करणारे मुसलमान आमच्या सोबत आले, तर आम्ही त्यांचे सुद्धा न्यायहक्क मिळवून देऊ.’ सत्ता येते आणि जाते मात्र माज करू नका, सत्ता डोक्यात जावू देऊ नका असंही त्यांनी सांगितलं.’ युतीत असताना काही तडजोडी काराव्या लागतात. त्यामुळे ज्यांना तिकीटं मिळाली नाहीत त्यांची मी माफी मागतो असंही ते म्हणाले.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, शिवसेने ही गद्दारी करणार्‍यांची नाही. आम्ही दिलेला शब्द पाळतो. देशभक्त मुस्लिमही आमचाच बांधव आहे. आज सुडाचं राजकारण करता अशी ओरड करणार्‍यांनी 2000 मध्ये शिवसेना आणि शिवसेना प्रमुखांना छळलं होतं तेव्हा काय सुडाचं राजकारण नव्हतं का असा सवालही त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर केला. जे सुडाचं राजकारण करतील त्यांना चिरडून टाकू. आमचा कारभार कसा असेल तर प्रभू रामचंद्रासारखा असेल, जनतेच्या सेवेसाठी आम्ही वचनबद्ध आहोत. प्राण जाए पर वचन ना जाए ही शिवसेनेची निती आहे, ही शिवसेनेची वृत्ती आहे. या देशात समान नागरी कायदा केला पाहिजे आणि सर्व घुसखोरांना हाकलून दिलं पाहिजे असंहे ते म्हणाले.