Breaking News

‘जिल्हा मराठा’चा महोत्सव

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा सर्व शाखांचा एकत्रित दसरा महोत्सव न्यू आर्ट्स, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या राजश्री शाहू महाराज सभागृहात झाला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशे, सहसचिव अ‍ॅड. विश्‍वास आठरे, खजिनदार डॉ.विवेक भापकर, विश्‍वस्त अ‍ॅड.दीपलक्ष्मी म्हसे, सीताराम खिलारी, मुकेश मुळे, माणिक मोरे, अभय खानदेशे, जयंत वाघ, राहुल झावरे, माजी कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे यांच्यासह संस्थेची विविध महाविद्यालये, विद्यालयाचे शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी या महोत्सवाला उपस्थित होते. 
याप्रसंगी संस्थेने आयोजित केलेल्या आदर्श विद्यालय स्पर्धेत नगरच्या रेसिडेन्शिअल हायस्कूलला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल या शाळेचा 25 हजार रुपये रोख व स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
तसेच राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थांचा तसेच विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांचा संस्था पदाधिकार्‍यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थी, पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.