Breaking News

दोन पीएमसी खातेदारांच्या मृत्यूनंतर डॉक्टरची आत्महत्या

मुंबई 
पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी   अनेक धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत. बँकेत लाखो रुपये अडकल्याने तणावामुळे दोन खातेदारांचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. आता आणखी एक आत्महत्येचं प्रकरण समोर आलंय. वर्सोव्यात राहणार्‍या डॉक्टर योगिता बिजलानी (39) यांनी झोपेच्या गोळ्या खावून आत्महत्या केल्याचं उघड झालंय. त्याचं झचउ बँकेत खातं असून त्यात त्यांचे 1 कोटी रुपये अडकले आहेत. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. या आधी संजय गुलाटी आणि फत्तेमुल पंजाबी या दोन खातेदारांचा ह्रदयविकारामुळे मृत्यू झाला होता. योगिता बिजलानी या आधीच डिप्रेशनमध्ये होत्या. त्यांनी अमेरिकत असतानाही आत्महत्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी थेट या बँक घोटाळ्याचा संबंध आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

दोन खातेदारांचा मृत्यू
पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह (पीएमसी) बँकेच्या आणखी एका खाताधारकाचा मंगळवारी मृत्यू झाला. 59 वर्षीय फत्तोमल पंजाबी यांचा हार्टअटॅकने मृत्यू झाला होता. त्यांचे नातेवाईक दीपक पंजाबी यांनी सांगितले की, पीएमसी बँकेत फत्तोमल पंजाबी यांचे 20 लाख रुपये होते. ते पैसे त्यांना काढता येत नव्हते. त्यामुळे ते तणावात होते. 24 तासांत ही पीएमसीच्या खातेदाराचा मृत्यू झाल्याची ही दूसरी घटना आहे. याआधी ओशिवारा येथील तारापोरेवाला गार्डन इथं राहणारे संजय गुलाटी यांचा मृत्यू झाला होता.