Breaking News

नगर महाविद्यालयात ग्रंथालय चित्रिकरणावर विचारमंथन

अहमदनगर/प्रतिनिधी
 “संगणकीय जाळ्याचे एक उदाहरण म्हणजे डेलनेट असून माहिती संग्रह, प्रतिप्राप्ती, आर्थिक व व्यवस्थापकीय बांधिलकी, एलेगॉरिझम, नॅक निवडीत ग्रंथालयांचा सहभाग व उपाययोजना, या विषयांवर या कार्यशाळेत प्रत्यक्ष कार्य आणि परीक्षण यानुसार मार्गदर्शन व चर्चा करण्यात येईल. डेलनेटच्या वापराने ग्रंथालये, माहिती केंद्रे उपयोजकाला कार्यक्षम व तत्पर सेवा कशी देता येईल याची प्रात्यक्षिकासह माहिती देण्यात येणार आहे’’ असे प्रतिपादन ‘आयएमएस’चे संचालक डॉ. एम. बी. मेहता यांनी केले.
येथील बीपीएचई सोसायटीच्या आयएमएस संस्थेत दि.14 ऑक्टोबरला दिल्ली येथील डेलनेटच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार्‍या या कार्यशाळेत स्ट्रॅटेजिक फॉर ट्रान्सफॉर्मिंग लायब्ररीज ग्रोइंग ट्रेंडस अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या विषयावर विचारमंथन होणार आहे. यात डॉ.एच.के.कौल, डॉ.संगीता कौल, डॉ.नीला देशपांडे व डॉ.स्वाती बार्नबस यांची व्याख्याने होणार आहेत. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली आहे.
या कार्यशाळेस ग्रंथपाल, ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ.एम.बी.मेहता, प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, आयएसडब्ल्यूआरचे संचालक डॉ.सुरेश पठारे, ग्रंथपाल डॉ.स्वाती बार्नबस यांनी केले आहे.