Breaking News

करदात्यांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली
नरेंद्र मोदी सरकारने करदात्यांसाठी  मोठा निर्णय घेतलाय. यामुळे आता करदात्यांना कुठल्याही तक्रारीसाठी इन्कम टॅक्स अधिकार्‍यासमोर हजर व्हावं लागणार नाही. Income tax विभागाने करदात्यांसाठी उद्यापासून म्हणजे मंगळवार (8 ऑक्टोंबर) पासून फेसलेस असेसमेंट सुरू केलंय त्यामुळे टॅक्स अधिकार्‍यांची दहशत आता वाटणार नाही असा दावा सरकारने केलाय. सरकारचे महसूल सचिव अजय भूषण पांडेय आणि उइऊढ चे संचालक झीरोव उहरपववीर चेवळ यांनी या केंद्राचं उद्घाटन केलं.

8 ऑक्टोबरपासूनच Income tax विभाग पूर्णपणे ऑनलाईन झाला आहे.  Faceless-- assessment मुळे लोकांना आता अधिकार्‍यांसमोर जावं लागणार नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि लोकांचा वेळही वाचेल. टॅक्स दहशतवादामुळे सरकारविषयी व्यावसायिकांच्या मनात दहशत निर्माण होते. त्यामुळे उद्योगधंद्यांवर परिणाम होतो आणि सरकारची प्रतिमा डागाळते. याविषयी कायम तक्रारी आल्यानंतर सरकारने हे धाडसी पाऊल उचललं आहे.

टॅक्स संदर्भात जी काही कारवाई करायची आहे ती याच पोर्टलच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे ग्राहकांना अतिशय चांगल्या दर्जाच्या सोईसुविधाही मिळणार आहेत.  www.incometaxindiaefiling.gov.in इथं लॉगिन करून नावं नोंदवावं लागणार आहे. इथे आलेल्या माहितीचं अधिकारी तपासणी करणार असून ती माहिती कुणाची आहे याची माहिती त्यांना कळणार नाही. देशातल्या दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये या सुविधांसाठी आठ विभागीय केंद्रं राहणार आहेत.