Breaking News

विचारपूर्वक मतदानाने घडते उज्ज्वल भविष्य : कुलकर्णी

अहमदनगर/प्रतिनिधी
“मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार असून विचारपूर्वक मतदान करुन आपले उज्ज्वल भविष्य घडविता येते. यासाठी योग्य मतदान करुनच आपण शहराचा, राज्याचा आणि देशाचा खरा विकास करु शकतो. म्हणून अवश्य मतदार करा’’, असे आवाहन सीताराम सारडा विद्यालयाचे मुख्याध्यापक दीपक कुलकर्णी यांनी केले.
सीताराम सारडा विद्यालयात  ‘मतदान करणारच...’ ही शपथ शिक्षक व पालकांनी घेतली. याप्रसंगी मुख्याध्यापक दीपक कुलकर्णी, पर्यवेक्षक लहू घंगाळे, विनोद जोशी, अशेाक डोळसे, दीपक शिरसाठ यांच्यासह शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मतदानाचे महत्व पटावे म्हणून विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन विद्यालयाचे चेअरमन प्रा.मकरंद खेर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पालक सभा आयोजित करुन मतदानाचे महत्व शिक्षकांमार्फत पालकांपर्यंत पोहचविण्यात आले.
पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष शिंदे यांनी विविध उपक्रमांचे कौतुक करुन उपस्थित  पालकांना मतदान करण्याचे आवाहन केले. सभेचे नियोजन वैशाली पिसे, निमा राहिंज यांनी केले तर सूत्रसंचालन सुजाता खामकर यांनी केले.