Breaking News

प्रो कबड्डी लीग : जयपूरच्या विजयात दीपक चमकला

पंचकुला
दीपक नरवालच्या चतुरस्र चढायांच्या बळावर जयपूर पिंक पँथर्सने बेंगळूरु बुल्सचा 41-34 असा पराभव केला.  दीपकने चढायांचे 16 गुण मिळवले. निलेश साळुंखेने नऊ  गुण मिळवून त्याला अप्रतिम  साथ दिली. बेंगळूरुकडून पवन  शेरावतने चढायांचे 14 गुण मिळवले. परंतु तो संघाचा पराभव टाळू  शकला नाही. दुसर्‍या सामन्यात हरयाणा स्टीर्सने तेलुगू टायटन्सचा 52-32 असा पाडाव केला. विकास  खंडोलाने नेत्रदीपक चढाया करीत 13 गुण मिळवले. विनय (8 गुण) आणि रवी कुमार (7 गुण) यांनी त्याल अप्रतिम साथ दिली. तेलुगू टायटन्सच्या सिद्धार्थ देसाईने चढायांचे 12 गुण मिळवले.