Breaking News

शिर्डीमध्ये आठ उमेदवारांचे तेरा अर्ज

राहाता (प्रतिनिधी)
शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांनी 13 उमेदवारी अर्ज दाखल केले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजप पक्षाकडून चार अर्ज तर काँग्रेस कडून सुरेश जगन्नाथ थोरात यांनी दोन अर्ज दाखल केले. वंचित बहुजन आघाडी कडून विशाल बबन कोळगे यांनी अर्ज दाखल केला. अपक्ष म्हणून डॉ.शेखर भास्कर बोऱ्हाडे यांनी दोन अर्ज, विश्वनाथ पांडुरंग वाघ, अल्ताफ इब्राहीम शेख, सिमोन ठकाजी जगताप बहुजन समाज पार्टी, राजेंद्र सखाराम पठारे अपक्ष यांनी प्रत्येकी एक अर्ज दाखल केला आहे. असे एकूण 8 उमेदवारांनी 13 उमेदवारी अर्ज दाखल केले 5 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होणार असून सात ऑक्टोबरला अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी खरीच चित्र स्पष्ट होईल यानंतर निवडणुकीला खरी रंगात येईल