Breaking News

श्रीगोंदे पोलिसांचे गावठी हातभट्टीवर छापे, एकास अटक

कोळगाव/प्रतिनिधी:
श्रीगोंदे तालुक्यातील पिसोरे बु. येथे पहाटेच्या दरम्यान पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर छापे टाकले. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या टीमने ही कारवाई करत ५५ हजार रु किमतीचा गावठी दारू बनविण्याच्या कच्या मालाचे  आठ लोखंडी बॅरल नष्ट केले. या कारवाईत रमेश धनाजी पवार या आरोपीस अटक केली आहे.

 पिसोरे बु. येथे गावठी दारू बनविण्यात येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना समजली. कर्जतचे उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या आदेशाने बेलवंडी पोलिस ठाण्याचे पो.नि.माने यांनी गुरुवारी (दि. १७) पहाटे कोंबिंग ऑपरेशन करत गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर छापा मारून तेथील ५५ हजार रु किमतीचा गावठी दारू बनविण्याचा कच्चा मालाचे आठ लोखंडी बॅरल जागीच नष्ट केले. रमेश धनाजी पवार (रा. येळपणे) याला अटक करण्यात आली. त्याच्यावर महा.प्रो.ऍक्ट कलम ६५ (ई)(फ) प्रमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.मधुकर सुरवसे, संभाजी शिंदे, पो.ना. झावरे व आरपीएसएफच्या पथकाने ही कामगिरी केली.