Breaking News

चंद्रकांत पाटील यांच्याविरोधात लढणारा उमेदवार भाजपात

पुणे
कोथरूड विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याविरूद्ध अपक्ष उमेदवारी अर्ज भरलेल्या आशिष कुंटे यांनी सोमवारी माघार घेतली आहे. त्यांनी चंद्रकांत पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
आशिष कांटे यांनी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सोमवारी त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भारतीय जनता पक्ष, शिवसेना महायुतीचे उमेदवार असलेल्या चंद्रकांत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. उमेदवारी अर्ज मागे घेताना आशिष कांटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. चंद्रकांत दादा पाटील यांनी कांटे यांचे भाजपात स्वागत केले. कांटे यांच्या पक्षप्रवेशाबद़दल बोलताना पाटील म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे अनेक तरुण भाजपात काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. आशिष कांटे यांनीही भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पक्षात स्वागत करतो. पुण्यातील भाजपचे नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी भोर-वेल्हा-मुळाशी या मतदारसंघातून अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांची बंडखोरी शमवण्यात भाजपाला यश आले आहे.