Breaking News

'बॉडी चेकअप' शिबिरात दीडशे रुग्णांची मोफत तपासणी

नेवासे/प्रतिनिधी
नेवासे फाटा येथे 'बॉडी चेकअप' शिबिर पार पडले. या शिबिरात १५० रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. आहार व व्यायामाच्या माध्यमातून आयुष्याला सुंदर बनवा असे आवाहन जागतिक आरोग्य सल्लागार पाथर्डी येथील डॉ.तुकाराम नेहरकर यांनी यावेळी बोलताना केले.यावेळी झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी जागतिक आरोग्य सल्लागार पाथर्डी येथील डॉ.तुकाराम नेहरकर हे अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

 यावेळी जागतिक आरोग्य सल्लागार अर्जुन सुसे, रविंद्र वेताळ, सुरेश उभेदळ, सामाजिक कार्यकर्ते गोपाल गायकवाड, श्रीराम राठोड, दीपाली पुणेकर, जयकिसन ढाकणे, सुरेश उभेदळ, होमगार्ड समादेशक बाळासाहेब देवखिळे, साईनाथ वडते आदी उपस्थित होते.

 यावेळी वेलनेस फिटनेस सेंटरच्या चालक योगिता वडते व तमन्नाबी शेख यांनी स्वागत करून वेलनेस फिटनेस सेंटर सुरू करण्यामागची भूमिका विशद केली. आहारातून आरोग्याकडे प्रत्येकाला नेण्यासाठी फिटनेस सेंटर सुरू करण्यात आले असून महिलासाठी पहाटे ५ ते ६ तर पुरुषांसाठी ६ ते ७ अशी वेळ ठेवण्यात आली असून दीर्घायुषी जीवनासाठी या फिटनेस सेंटरचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर मन्नाबी शेख यांनी आभार मानले.