Breaking News

शस्त्र व धर्माच्या शास्त्रामुळे राष्ट्र होते मोठे : रामदासी

अहमदनगर/प्रतिनिधी
“छत्रपती शिवाजी महाराज, थोरले शाहू महाराज व योद्धा बाजीराव पेशवा यांनी शास्त्राबरोबरच शस्त्राचे महत्व जाणले म्हणूनच राष्ट्र समर्थ झाले. पूर्वजांच्या पराक्रमामुळेच शस्त्र आदी धर्माचे शास्त्र राष्ट्र मोठे करु शकेल’’, असे प्रतिपादन  मंदारबुवा रामदासी यांनी केले.
थोर योद्धा, पानिपतवीर सरदार अंताजी माणकेश्‍वर गंधे स्मृती न्यासातर्फे खंडेनवमीनिमित्त नगरमधील सावेडी येथील उद्योजक मिलिंद व मीलन गंधे यांच्या निवासस्थानी आयोजित गंधे वंशजाचे ‘शस्त्रपूजन’ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सरदार गंधे न्यासाचे कुटूंबप्रमुख विश्‍वस्त योगेश्‍वर गंधे, उपाध्यक्ष कर्नल विष्णू गंधे, सतीश गंधे, रोहिणी गंधे, गौरव गंधे, गौतम गंधे, मुकुल गंधे आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रारंभी कापरे गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली जगदंबेस पूजन व संकल्पाद्वारे आवाहन केले. योगेश्‍वर गंधे यांनी संपूर्ण शस्त्रागाराची माहिती उपस्थितांना दिली तर कर्नल विष्णू गंधे यांनी गंधे न्यासाचे कार्य व शस्त्राचे महत्व सांगितले. यावेळी शस्त्रपूजन प्रसंगी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.