Breaking News

सुर्वे साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्षपदी भालेराव

संगमनेर/प्रतिनिधी

सुर्वे वाचनालय आणि प्रगतिशील लेखक संघ यांच्यावतीने आज (मंगळवार)  नाशिक येथे कविवर्य नारायण सुर्वे साहित्यिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षपदी संगमनेर येथील प्रसिद्ध कादंबरीकार के.जी. भालेराव यांची निवड करण्यात आली आहे. भालेराव यांना अध्यक्षपदाचा मान मिळाल्याबद्दल ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे, रंगनाथ पठारे आणि साहित्य क्षेत्रातील सर्वच मंडळींना याचा आनंद झाला आहे.

   नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालय याठिकाणी साहित्य मेळावा होणार असून यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. अनिल सपकाळ उपस्थित राहणार आहे. साहित्य मेळाव्यात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले असून यात कॉ.भालचंद्र कानगो, प्रा.डॉ. मिलिंद कसबे, विष्णुपंत गायखे तर कविसंमेलनात संजय दोबाडे, सत्यजित पाटील, सोपान खैरनार, नौशाद अब्बास, शिवाजी पगारे, दिनेश शिरसाठ, बुद्धभूषण साळवे, अमोल जगताप, सिद्धार्थ जगताप, प्रमोद अहिरे यांच्यासह अनेक कवी यात सहभागी होणार आहेत. संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या के.जी. भालेराव यांनी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. स्मशानभूमी, भोगी, सूर्या, अक्षराचे भोई यांसह अनेक कादंबरी आणि कथा संग्रह त्यांनी लिहिले आहे. भालेराव सध्या पुरोगामी साहित्य संसदेचे अध्यक्ष असून सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान आहे.