Breaking News

अब्दुल्ला पितापुत्रांना भेटण्याची परवानगी

श्रीनगर
सध्या स्थानबद्ध असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला आणि उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांना रविवारी भेटण्याची परवानगी जम्मू- काश्मीर प्रशासनाने जम्मू प्रांतातील या पक्षाच्या एका प्रतिनिधी मंडळाला दिली आहे. प्रांतिक अध्यक्ष देवेंदर सिंह राणा यांच्या नेतृत्वाखालील आणि पक्षाच्या माजी आमदारांचा समावेश असलेले हे प्रतिनिधी मंडळ जम्मूहून उद्या सकाळी श्रीनगरला जाईल, असे नॅशनल कॉन्फरन्सचे प्रवक्ते मदन मंटू यांनी सांगितले. राणा यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे या भेटीची परवानगी मागितली होती.