Breaking News

’इतका कडक गांजा देशात आला कुठून’; ठाकरेंविरोधातल्या पोस्टमुळे खळबळ

कोल्हापूर
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात फेसबुकवर पोस्ट केलेल्या उमेदवाराला कोल्हापूर जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी आचारसंहिता भंग केल्याची नोटीस बजावली आहे. प्रशांत गंगावणे असं या उमेदवाराचं नाव असून ते हातकणंगले मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. आरे प्रकारणावर पोस्ट करताना गंगावणे यांनी आदित्य ठाकरे यांचा धूर काढताना फोटो तयार करून ’इतका कडक गांजा देशात आला कुठून’ असा उल्लेख केला आहे. याचा 24 तासात खुलासा करण्याचे आदेश या नोटीसीद्वारे देण्यात आलेत.

आरेतली झाडं तोडल्याचं दु:ख माझं एकट्याचं नाही. संपूर्ण मुंबईकरांचं असल्याची प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी दिली होती. ज्या ठिकाणी झाडे तोडली त्याच ठिकाणी आपण सर्व झाडे लावू असंही आदित्य ठाकरे म्हणाले होते. मला एकट्यालाच नाही तर सगळ्या मुंबईकरांना दु:ख झालं. जी झाडं तोडली आहेत त्याच ठिकाणी आपण सगळी झाडे लावू असंही ते म्हणाले होते.

दरम्यान, मुंबई मेट्रो 3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीमधील वृक्षतोडीला विरोध करणार्‍या याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात सुमारे 700 झाडांवर कुर्‍हाड चालवली. या प्रकरणावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ’ट्विट’ करत तसेच माध्यमांशी संवाद साधत प्रशासनाच्या कारवाईवर तिखट प्रतिक्रिया दिली होती. रात्री कारवाई करायला ’आरे’ हे ’झजघ’ नव्हे, अशा शब्दात आदित्य यांनी टीका करत या कारवाईचा निषेध व्यक्त केला होता. तसंच भाजप सरकारच्या वृक्षसंवर्धन मोहिमेवरही आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला होता.

आरेमधील जैवविविधता संपवणे ही लज्जास्पद बाब आहे. मेट्रोचे अधिकारी ज्याप्रकारे आरेतील झाडांची कत्तल करत आहेत ते अत्यंत संतापजनक आहे. या अधिकार्‍यांची पाक व्यपपीओकेमध्ये नेमणूक करायला हवी आणि झाडांऐवजी दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्याचे काम त्यांना द्यावे, असेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.  सत्ता आल्यावर  ’आरे’ला जंगल घोषित करण्यात येईल, असा निर्धार आदित्य ठाकरे यांनी बोलून दाखवला होता.

सुप्रीम कोर्टात धाव घेणार

आरेमधील वृक्षतोडीनंतर पर्यावरण प्रेमी, राजकीय पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. शिवसेनेने या प्रकरणी आता सुप्रीम कोर्टात धाव घेण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या अंधारात अशाप्रकारे वृक्षाची कत्तल करणे नियमबाह्य आहे. या कारवाईच्या विरोधात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचे मुंबई मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी म्हटलं. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीनेही आरेमधील वृक्षतोडीला जोरदार विरोध केला.

आरे परिसरात जमावबंदी

मुंबई महापालिकेने पोलिसांच्या मदतीने रातोरात सुमारे 700 झाडांवर कुर्‍हाड चालवल्याचे समजताच पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आरे परिसरात धाव घेतली. ठिय्या आंदोलन केलं. आंदोलन आणि आक्रमक पवित्र्यानंतरही झाडांची कत्तल थांबली नाही. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांना न जुमानता पोलीस आणि प्रशासनाने त्यांच्यावरच कारवाई केली. पोलिसांनी आतापर्यंत 38 जणांना अटक केली असून तर 55 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. आंदोलकांना पोलिसांनी कोर्टात हजर केलं असता सगळ्यांना कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली. या कारवाईनंतर आरेमध्ये तणाव पसरला होता. आरे परिसरात कलम 144 म्हणजेच जमावबंदी लागू केली. आरेचा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सध्या या परिसरात जाण्यासाठी पोलिसांनी बंदी घातली असून कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे.