Breaking News

आंतर महाविद्यालयीन स्पर्धेत बेलापूरला उपविजेतेपद

बेलापूर/प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर जिल्हा विभागीय क्रीडा समिती २०१९/२० व अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले, यांच्या संयुक्त विद्यमाने बॉल बॅडमिंटन मुले आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूरच्या संघाला उपविजेते पद मिळाले. या स्पर्धेत ऋषिकेश नवले, दत्तात्रय कोल्हे, शिवा, समर्थ टाकसाळ, ऋषिकेश सराफ या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. सदर लढत अटीतटीची झाली. या स्पर्धेसाठी बेलापूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. निवड समिती अध्यक्ष म्हणून प्रा.राळेभात, प्रा.विनायक काळे, प्रा. नितीन वाळुंज, यांनी काम पाहीले. त्यांच्या या कामगिरीबद्दल बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपत मुथ्था, सचिव शरद सोमाणी, उपाध्यक्ष अशोक साळुंके, महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष राजेश खटोड, रविंद्र खटोड, सरपंच भरत साळुंके, व सर्व पदाधिकारी, प्राचार्या डॉ. गुंफा कोकाटे, व सर्व प्राध्यापक, सेवकवृंद, ग्रामस्थ आदींनी त्यांचे अभिनंदन केले. खेळाडूंना कोच म्हणून प्रा. विनायक काळे यांचे मार्गदर्शन लाभले.