Breaking News

ज्येष्ठ नागरिक मंचातर्फे ‘भावबंध’ कार्यक्रम

अहमदनगर/प्रतिनिधी
येथील ज्येष्ठ नागरिक मंच, सावेडी आयोजित कार्यक्रमात गुरुकृपा सोसायटी येथे गणेश मराठे व ऋचिता शिरोळे यांनी भावसंगीत कार्यक्रमात गणेश वंदना, देव माझा मी देवाचा, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, रिमझिम झरती श्रावणधारा, दम दमा दम मस्त कलंदर, ओ लालजी ओ लालजी, अरुण दाते यांचे मान वेळावूनी धुंद होऊ नको चालताना अशी वीज होऊ नको, रामदास कामत यांचे मयुरा रे फुलवित मेरे पिसारा, प्रीतीच्या चांदराती, हिची चाल तुरु तुरु, मस्ताना जोगी आयारे आया रे, मन लोभले मन मोहले गीतात आले तुझ्यामुळे आदी भक्तिगीते व भावगीते सादर केली.
संवादिनीवर स्वतः गणेश मराठे, तबला साथ हर्षद भावे यांनी उत्तम  दिली. सिंथेसायझर वादन अंबरिश जहागीरदार यांनी केले. या कार्यक्रमास एन.डी. कुलकर्णी, श्रीकांत नाईक, रामचंद्र धर्माधिकारी, चंद्रशेखर करवंदे, सुरेश हातवळणे, नंदकुमार ब्रह्मे, बाजीराव जाधव उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्वोत्तम क्षीरसागर, आदिनाथ जोशी, शरद कुलकर्णी, चारूशीला करवंदे, पुष्पा चितांबर, शुभदा कुलकर्णी, मोरेश्‍वर मुळे, शिवप्रसाद जोशी, ज्योती केसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. शुभदा कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले, तर स्नेहल वेलणकर यांनी आभार मानले.