Breaking News

निवडणूक खर्च निरीक्षक अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार तपासणी

अहमदनगर/प्रतिनिधी
भारत निवडणूक आयोगाने निर्देशित विहीत नमुन्यात प्रत्येक उमेदवाराने आपल्या निवडणूक खर्चाचा सर्व हिशोब ठेवणे बंधनकारक आहे. तसेच संपूर्ण निवडणूक प्रक्रियेच्या दरम्यान किमान 3 वेळा विहीत नोंदवह्यांची तपासणी खर्च निरीक्षक यांच्याकडून होण्यासाठी उमेदवारांनी विहीत दिनांकास आपला खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने विधानसभा मतदार संघातील निवडणूक लढविणार्‍या  सर्व उमेदवारांच्या निवडणूक  खर्चाचे वेळापत्रक निवडणूक खर्च निरीक्षक नागेंद्र दीक्षित यांच्या निर्देशानुसार पहिली तपासणी गुरुवारी (दि.10) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत, दुसरी तपासणी सोमवारी (दि.14) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत व तिसरी तपासणी शुक्रवारी (दि. 18) सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यत निश्‍चित करण्यात आली आहे.
निवडणूक खर्चाची तपासणी निवडणूक निर्णय अधिकारी, विधानसभा मतदार संघांचे दालन, आकाशवाणी केंद्रासमोर, तहसील कार्यालय येथे होणार आहे. या दिवशी उमेदवाराने तपासणी दिनांकाच्या आधीच्या दिवसापर्यंतचा सर्व हिशोबाचा तपशील सादर करणे आवश्यक आहे, असे विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार उमेश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.