Breaking News

कांबी हायस्कूलमध्ये कॉ.आबासाहेब काकडे यांना अभिवादन

चापडगाव/प्रतिनिधी
कांबी हायस्कूल कांबी याठिकाणी कॉ. आबासाहेब काकडे यांचे 41 वे पुण्यस्मरण साजरे करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प.दत्तात्रय महाराज बोरकर हे होते. कार्यक्रमाच्या वेळी विद्यार्थ्यांची भाषणे झाली.
विद्यालयाचे मुख्याध्यापक निवृती भांगरे यांनी मनोगतात कॉ.आबासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजीक व राजकीय कार्यातून समाजाने प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. तसेच अध्यक्ष बोरकर महाराज यांनी आदर्श जीवन घडविण्याकरिता संतविचार आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कॉ.आबासाहेबांनी संत वामनभाऊ, भगवानबाबा यांच्या सहवासातूनच आदर्श जीवन घडविल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या वेळी ह.भ.प.गणेश गाडे, सुरेशचंद्र होळकर (ग्रा.प.सदस्य) अशोकराव म्हस्के, योगेशराव कुर्हे, उपसरपंच ज्ञानेश्‍वर म्हस्के, रमेशराव दुसंगे, सुरेशराव थोरात,  रमेशराव खरात, बबनराव होळकर, ह.भ.प.कृष्णा महाराज कुर्हे, दत्तात्रय म्हस्के, महादेव शिंदे,  अशोकराव भेरे, भीमराव भेरे तसेच इतर मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. कांबी हायस्कूल कांबी व कांबी छात्रालय कांबी यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी सुञसंचालन दिगंबर नजन यांनी केले. तर समारोप संजय मरकड यांनी केले.