Breaking News

मुलगा मेला समजून केले होते अंत्यसंस्कार, तोच मुलगा झाला जिवंत

जोधपूर
राजस्थानमधील पाली जिल्ह्यातील दुर्घटनेत मृत पावलेल्या एका युवकाच्या चुकीच्या ओळखपत्रामुळे दुसर्‍या युवकाच्या कुटूंबाला 20 दिवस दुःखात घालवावे लागले. मृत व्यक्तीजवळ जे आधार कार्ड मिळाले त्यात गल्लत केल्याने अज्ञात मुलाला आपला मुलगा मानून त्याचे अंत्यसंस्कारही केले. 12 वे सर्व विधीही पूर्ण केले. मात्र 20 दिवसांनंतर शुक्रवारी तो मुलगी घरी परतला तेव्हा कुटुंबातील सदस्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. पण आता ज्याचे अंत्यसंस्कार केले तो युवक कोण होता याच्या चौकशीला पोलीस लागले आहेत.
17 सप्टेंबरला  झाली होती दुर्घटना
जोधपुर येथील मंडोर ठाण्याच्या जवळील मघराजजी टांका येथे ही घटना घडली. येथे एका युवकाचा ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. या अपघातात युवकाच्या शरीराचे अनेक तुकडे झाले. मंडोर पोलीस ठाण्यात मृताच्या खिशातून मिळालेल्या आधारकार्डकडे पाहून त्याची ओळख ठरवण्यात आली. पोलिसांनी युवकाच्या कुटुंबियांना बोलावून त्यांच्याकडे मृतदेह सोपवला. मिळालेल्या आधार कार्डवर कुटुंबियांनीही मृतदेह ताब्यात घेतला आणि अंत्यसंस्कार केले. यानंतरच्या सर्व विधी पार पाडल्या.
आधार कार्ड दोन महिन्यांपूर्वीच हरवलं
दरम्यान, बिलता बाडिया गावातील एकाला शुक्रवारी जोधपुरमध्ये प्रकाश दिसला. सुरुवातीला तो प्रकाशच आहे यावर त्याचा स्वतःचा विश्‍वास बसला नाही. त्याने लगेच प्रकाशच्या बाबांना आणि भावाला फोन केला. ते जोधपुरला आल्यावर जिवंत मुलाला पाहून त्यांचा आनंद द्वीगुणित झाला. प्रकाश म्हणाला की, दोन महिन्यापूर्वी त्याचं आधार कार्ड हरवलं होतं. ते कार्ड कदाचित मृत व्यक्तीला मिळालं असेल. त्याच आधार कार्डावरून पोलिसांना वाटले की मृत व्यक्ती हा प्रकाशच आहे.
 मृत तरूण कोण
प्रकाश जोधपुरमध्ये राहून मजुरी करतो. पाच- सहा महिन्यांपूर्वी प्रकाशची पत्नी त्याला सोडून गेली होती. प्रकाश स्वतःकडे कोणताही मोबाइल ठेवत नाही. शुक्रवारी जेव्हा प्रकाशला त्याच्या गावी नेण्यात आले तेव्हा त्याचं ढोल- ताशांनी स्वागत करण्यात आले. आता पोलीस मृत झालेला व्यक्ती कोण होता याचा तपास करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हालचालींना पहिलं यश, ’या’ मतदारसंघात उमेदवाराने अर्ज मागे घेतला.