Breaking News

प्रामाणिकपणाने काम केल्यास मिळते देवपण : देवढे

शेवगाव/प्रतिनिधी
नवमहाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या आबासाहेब काकडे डी.एड.व बी.एड. महाविद्यालय, शेवगाव येथे कॉ.आबासाहेब काकडे यांच्या 41 व्या पुण्यतिथी कार्यक्रमानिमित्त शिवनाथजी देवढे अध्यक्ष मध्यवर्ती समिती आबासाहेब काकडे शैक्षणिक समूह, शेवगाव यांनी व्यासपीठावरून मार्गदर्शन करताना आपले विचार मांडले. ते म्हणाले की, प्रत्येकाने स्वतःसाठी न जगता समाजासाठी जगून आपला सामाजिक विकास करावा, त्याच प्रमाणे अविरत प्रामाणिकपणाने काम केल्यास माणसाला देवपण मिळते.
आबासाहेब काकडे डी.एड. व  बी.एड. महाविद्यालय, शेवगाव येथे महाविद्यालयाच्यावतीने कॉ. आबासाहेब काकडे याच्या 41 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. प्रथम मा. शिवनाथजी देवढे यांच्या हस्ते कॉ. आबासाहेब काकडे व निर्मलाताई काकडे यांच्या प्रतिमेचेपूजन करण्यात आले. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरुण चोथे यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेत कार्यरत असलेल्या अभ्यासक्रमाचा आढावा घेतला. तसेच बी.एड. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रोहिदास उदमल्ले यांनीही अभिवादनपर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना समाजकार्यात थोडाफार खारीचा वाटा उचलावा असे स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमात पुढे आपल्या मार्गदर्शनात मा.देवढे सर यांनी कॉ.आबासाहेब काकडे यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करत प्रत्येकाने आबासाहेबांची प्रेरणा घेऊन शक्य तेवढे समाज सुधारण्यास हातभार लावावा. दुसर्‍याच्या दुखात सहभागी व्हावे, इतरांना मदत करावी आणि आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करत रहावे. असे छात्र अध्यापकांना आवाहन केले. सूत्रसंचालन छात्राध्यापिका अंजली देशमुख व अनुराधा वाळूंजकर यांनी केले. तर आभार प्रा.राजेंद्र बांगर यांनी मानले.