Breaking News

‘हातोडा फेक’ स्पर्धेत अफराज सय्यद प्रथम

अहमदनगर/प्रतिनिधी
 तालुक्यातील नेप्ती येथील नेप्ती विद्यालयाचा खेळाडू अफराज नसीर सय्यद याने हातोडा फेक स्पर्धेत नगर तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. त्याची जिल्हा पातळीवर होणार्‍या स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालय आणि नगर तालुका क्रीडा समितीच्या संयुक्त विद्यमाने वाडिया पार्क क्रीडा संकूल येथे नुकत्याच तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा झाल्या. यामध्ये 17 वर्षे वयोगटात ‘हातोडा फेक’ मध्ये सय्यद याने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याला क्रीडाशिक्षक अरुण दळवी आणि दत्तात्रय शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले. तो नेप्ती विद्यालयात इयत्ता 10 वीमध्ये शिकत आहे. विजयी खेळाडूंचे मुख्याध्यापक किशोर खजिनदार, रामदास फुले, शिक्षक व ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.