Breaking News

‘जाणता राजा’च महाराष्ट्राचा खरा पुरोगामी

महाराष्ट्रातल्या विधान सभेच्या निवडणुका म्हणजे घराणेशाहीचा सोहळाच म्हणावा लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्षे पूर्ण होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाला, देशवासियाला  या देशाचा मालक बनविले. परंतु देशातील पूर्वापार चालत आलेल्या प्रस्थापित समूहाने लोकशाही पायदळी तुडविण्याचाच प्रयत्न केला. हे मागील 14 व्या लोकसभेपर्यंत चालू होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  घटनात्मक अधिकारामुळे या देशातला सर्वसामान्य चहा विक्रेता या देशाचा पंतप्रधान झाला. परंतु या देशातील  प्रस्थापित समूहाला हा प्रहार मोठा जाणवला. म्हणून देशामध्ये काश्मिर ते कन्याकुमारीपर्यंत देशातील  सर्वसामान्य माणसांना एक वेगळा किरण दिसला. परंतु प्रस्थापितांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र येऊन संघप्रणालीचे नव्हे तर भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही याची काळजी घेतली.  परंतु घडले उलटेच. भाजप (मोदी) सरकार सत्तेवर आले. खरे पण ‘जाणता राजा’च महाराष्ट्राला वाचवू शकतो? लोकशाही अबाधित ठेवू शकतो?
महाराष्ट्रातल्या विधान सभेच्या निवडणुका म्हणजे घराणेशाहीचा सोहळाच म्हणावा लागेल. देशाला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्षे पूर्ण होत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील प्रत्येक नागरिकाला, देशवासियाला  या देशाचा मालक बनविले. परंतु देशातील पूर्वापार चालत आलेल्या प्रस्थापित समूहाने लोकशाही पायदळी तुडविण्याचाच प्रयत्न केला. हे मागील 14 व्या लोकसभेपर्यंत चालू होते. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या  घटनात्मक अधिकारामुळे या देशातला सर्वसामान्य चहा विक्रेता या देशाचा पंतप्रधान झाला. परंतु या देशातील  प्रस्थापित समूहाला हा प्रहार मोठा जाणवला. म्हणून देशामध्ये काश्मिर ते कन्याकुमारी पर्यंत देशातील  सर्वसामान्य माणसांना एक वेगळा किरण दिसला. परंतु प्रस्थापितांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी एकत्र येवून संघप्रणालीचे नव्हे तर भाजपचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नाही याची काळजी घेतली.  परंतु घडले उलटेच. भाजप (मोदी) सरकार सत्तेवर आले आणि या देशातील प्रस्थापित समूहाने पुन्हा एकदा भाजप (मोदी) कशी बदनाम होईल; यावरती लक्ष केंद्रीत केले. परंतु महाराष्ट्रातील व हरियाणा या  विधानसभेच्या निवडणुकीत (मोदींनी) भाजपने पुन्हा एकदा प्रस्थापितांना नामोहरम करण्याचा चंग बांधला.
त्यासाठी अनेक जुनी-पुराणी प्रकरणे (मोदी) भाजप सरकारनेच जाणूनबूजून आमच्या चौकश्या लावल्या व आम्हाला गुंतविण्याचा प्रयत्न (मोदी) भाजप सरकार करत आहे. असा टाहो फोडण्यास सुरूवात केली  आहे व प्रस्थापित पक्षातील अनेक नेतेमंडळी चौकश्यांना भिऊन भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. असा भास निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांनी पक्षांतर केले हे जर स्वच्छ असतील तर त्यांनी चौकश्यांना  सामोरे जाणे हीच खरी लोकशाही म्हणावी लागली असती. परंतु कुठे तरी पाणी मुरते आहे. म्हणूनच आपण केलेले पाप झाकण्यासाठी व या वयात तुरूंगवास भोगावयास लागू नये म्हणून पक्षांतर केले तर नाही नाही?
महाराष्ट्रातील दिग्गज नेते शरद पवार यांचे जवळचे स्नेही मा. ना. पद्मसिंह पाटील, मा. ना. मधुकरावजी पिचड, त्यांचे सुपूत्र आ. वैभव पिचड, ना. राधाकृष्ण विखे, त्यांचे सुपूत्र खा. डॉ. सुजय विखे, ना. हर्षवर्धन  पाटील असे अनेक मातब्बर नेते भाजपमध्ये का गेले? याचे प्रस्थापित पक्षांनी चिंतन करणे गरजेचे आहे. ज्यांनी अनेक वर्षे प्रस्थापित पक्षांबरोबर सत्ता उपभोगली त्यांना अचानक पक्ष सोडण्याची व सत्ताधारी पक्षांत  जाण्याची वेळ का आली, हे देखील महत्त्वाचे आहे. या मंडळीमुळे भाजप हा पक्ष शिस्तप्रिय आहे, असे मानले जात होते. भाजपवर संघप्रणालीचा पगडा आहे असे वाटत होते. परंतु भाजप देखील पक्षांतर केलेले नेते  कसे चांगले आहेत, हे आज महाराष्ट्रातील जनतेला पटवून देत आहेत. ही एक खेदाची गोष्ट आहे. म्हणजे भाजपकडे आलेले भ्रष्ट नेते पवित्र कसे झाले, यावर जनतेने विचार करणे गरजेचे आहे. लोकशाहीची थट्टा क रण्याचा प्रकार  प्रस्थापित पक्षांसह भाजप देखील करत आहे, हे विसरता येणार नाही. छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांच्या राज्यात  रयतेचे राजे छत्रपती शिवरायांनी गद्दारांना हत्तीच्या पायी दिले. हा इ तिहास आमचे महाराष्ट्रातील जाणते राजे विसरलेत काय? या गद्दारांना निवडणुकीनंतर पुन्हा महाराष्ट्रात सरकार बदलले तर पावन करवून घेतील काय? छत्रपती शिवरायांनी सर सेनापती नेताजी पालकरांना पुन्हा  आपल्यात सामावून घेऊन बहुजन समाजासमोर एक नवा पायंडा 350 वर्षांपूर्वी पाडला होता. त्याची पुनरावृत्ती 2019 मध्ये पुन्हा होईल काय? या देशातील लोकशाही जर टिकवायची असेल तर महाराष्ट्रातील  छत्रपती, फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांची कास पुन्हा एकदा धरावी लागेल. हेच एकंदरीत निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर दिसून येत आहे. महाराष्ट्रातील बहुजन समाज दिशाहीन, भरकटलेला झालेला पहावयास  मिळतो आहे. ही स्वातंत्र्यानंतर 70 वर्षांनी वेळ येत असेल तर ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? माझ्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा जाणता राजाची गरज आहे. सर्व समूहांना एकत्र घेऊन जाण्याची ताकद फक्त  बारा वाजता मती आलेला जाणता राजाच करू शकतो, हा आहे बहुजणांचा महाराष्ट्र एवढेच?