Breaking News

अतिक्रमण केल्याने कुंभारीच्या सरपंचाचे पद रद्द

 कोपरगाव / ता.प्रतिनिधी

 कोपरगाव तालुक्यातील कुंभारी येथील काळे गटाचे सरपंच प्रशांत एकनाथ घुले यांनी ग्रामपंचायत हददीतील गट नंबर ४३३ मधील वनविभागाच्या जमीनीत ४आर क्षेत्रावर अतिक्रमण केले. त्यामुळे त्यांचे सरपंचपद महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम १४ (ज 3) नुसार जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अपात्र ठरविले आहे.

 याबाबतची माहिती अशी की, कुंभारी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक २७ डिसेंबर २०१७ रोजी झाली. त्यात काळे गटाचे प्रशांत घुले हे सरपंच म्हणून निवडून आले. त्यांनी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्या मुददयावर दत्तू गजानन कदम आणि संजय चंद्रभान घुले (कुंभारी) यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्यासमोर ग्रामपंचायत विवाद अर्ज क्रमांक ४४/२०१९ दाखल केला होता. त्यावर दोन्ही बाजूंची सुनावणी झाली. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी १ ऑक्टोबर रोजी वरील निकाल पारीत केला.