Breaking News

अजिंक्य रहाणे बनला बाप

मुंबई/प्रतिनिधी
भारतीय कसोटी संघाचा उप-कर्णधार आपल्या खर्‍या आयुष्यामध्ये आता ‘बाप’माणूस बनला आहे. अजिंक्यची पत्नी राधिकाने मुलीला जन्म दिला आहे. भारताचा फिरकीपटू हरभजन सिंहने ट्विटरवर सर्वांना ही  आनंदाची बातमी सांगितली आहे. सध्या अजिंक्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम येथे कसोटी सामना खेळत आहे. अजिंक्य आणि राधिका हे शाळेपासून मित्र होते, या मैत्रीचं रुपांतर नंतर प्रेमामध्ये झालं. 26  सप्टेंबर 2014 मध्ये अजिंक्य आणि राधिकाचा विवाह झाला.