Breaking News

चाळीस वर्ष केले काय? आदीवासीं तहानलेला,निधी हळदीला..??

परिवर्तनासाठी सज्ज झालेल्या मतदारांचा पिचड पिता पुञाला सवाल

Pichad
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात  गेली ४० वर्षे सत्ता ही पिचड घराण्याकडे आहे . या 40 वर्षात अकोले तालुक्याचा विकास किती झाला याचे उत्तर पिचड यांच्याच जाहीर वाचनातून दिसते.चाळीस वर्षात विकास झाला असता तर आज मतांची बेगमी मागण्यासाठी पिचडपुञाला उंबरे झिजवावे लागले नसते.यातून चाळीस वर्ष केवळ भुलथापा देऊन आदीवासी मतदारांना मुर्ख बनवले आणि सवर्णांना अमिष दाखवले.अशी  कुजबुज मतदार संघात सुरू आहे.
   "या तालुक्यात पिचडांनि छोटी मोठी अशी अनेक धरणे बांधली.असा दावा पिजड यांच्या बगलबच्यांकडून केला जात असला तरी  या धरणात साठलेले पाणी लाभार्थी आदीवासींना मिळाले का? मिळाले नाही तर का नाही? कुठे मुरले ते पाणी ? पाणी मुरवण्याऐवाजी त्या धरणांवर खर्च दाखवलेला निधी तर जिरवला नाही? असे नाना प्रश्न पिचड यांच्या कथित विकासाला विचारले जात आहेत.
 अकोले मतदार संघातील  आदिवासी   शेतकरी आजही वरच्याच पाण्यावर शेती करत आहे . उन्हाळ्यात या गावांना टँकरने पाणी द्यावे लागत आहे फक्त  ठराविक "पुढारी, "लाभार्थी" व त्यांच्या मागे-पुढे फिरणारी "जनता" यांचाच विकास झाल्याचे पहायला मिळते आहे. ही मक्तेदारी मोडीत काढून  स्वत: जनतेने ही निवडणूक  हाती घेतली  आहे. म्हणून याला निवडणूक म्हणता येणार नाही. तर ही "जागरुक" जनतेच्या "वैचारिक अस्मितेची" लढाई आहे. असे म्हटल्यास काहीच वावघे ठरणार नाही.
          गेली ४० वर्षे तालुक्यात  एखाद्या "माहेरवाशिनी" प्रमाणे सत्ता "नांदत" राहिली. शरद  पवार यांनी पालक म्हणून कधी मंत्रीपद तर सत्ता नसताना देखील विरोधी पक्षनेते म्हणून तालुक्याला सन्मान दिला. पण, दुर्दैव असे की, त्या ४० वर्षात तालुका जितका "सुजलाम, सुफलाम" व्हायला पाहिजे होता. तितका तो झाला नाही.आज जनतेच्या दारात मत मागण्यासाठी येत असलेल्या पिचड पितापुञांनी काम  केले नाही. असे म्आहणण्म्हीयाचा कृतघ्नपणा आम्ही करणार नाही माञ चाळीस वर्षात मंञी आणि विरोधी पक्षनेता म्हणून सरकार दरबारी वजन वापरून जेव्हढा निधी आणणे शक्य होते तेव्हढी आस्था तालुक्याच्या वाकासासाठी दाखवली नाही.इतकेच काय तर शासकीय आकडेवारीनुसार या मतदार संघाला लोकप्रतिनिधीचा जो निधी मंजूर झाल्याचे दाखवले जाते तो निधीही प्रत्यक्ष कामावर खर्च झाल्याचे दिसत नाही.त्याच्या कुठल्याही खुणा मतदारसंघात दिसत नाहीत.अशी सल मतदारसंघातील तरूणांच्या मनात आहे.
 एकेकाळी या तालुक्याचे भुषण म्हणून ओळखले जाणारे आमदार पिताश्री मधुकर पिचड आदीवासींचा मसिहा म्हणून मिरवत होते.त्या आदीवासी बांधवांसाठी कुठले दिवे लावले?
       आदिवासी समाज्यासाठी ९ टक्के बजेटची तरतुद आहे. कुठे गेला तरतुदीचा निधी?त्या तुलनेत कोठे आहे या समाजाचा विकास ? निधी, तरतुद आणि विकास यांचे कोठेही "संतुलन" बसत नसल्याचे येथे प्रत्येकाला दिसत आहे.  काय म्हणतोय तालुक्यातील खेड्या पाड्यातील रस्ता ? गेली २०-२० वर्षे खडीला डांबर माहित नाही. क्षेत्रफळाने मोठा आणि मीनी जम्मु-कश्मिर  म्हणून ओळख असूनही अद्याप दळण-वळणाच्या सुविधा नाहीत. एकीकडे महिलांनी चंद्रावर पाऊले टाकलीत, आणि दुसरीकडे मरण दारशी आले. तर, आमची महिला दवाखान्यात पाऊल टाकू शकत नाही. किती मोठा विरोधाभास आहे हा. होय.! हेच वास्तव आहे या तालुक्याचे. आरोग्य नाही, शिक्षण नाही, रोजगार नाही, पर्यटन नाही किती प्रश्न मांडावेत, त्याला कोणतेच उत्तर शोधून सापडत नाही. त्यामुळे, "विकास" करायचा असेल. तर, "परिवर्तन" अपरिहार्य मानले जात असून पिचड यांना पर्याय म्हणून डाॕ.किरण लहामटे  या तरूणाकडे  मतदारांच्हया नजरा लागल्या  आहेत.प्रत्येक व्यक्ती आपल्या निर्धारावर ठाम असून तरूण रस्त्यावर  बदलाची "मशाल"  घेऊन धावत आहे. याच   लोकार्थाने मतदारांनी ही निवडणूक हातात घेतल्याचे दिसत असून, डॉ. लहामटे कुणा पक्षाचे  नाही तर, खऱ्या अर्थाने "जनभावनेचे प्रतिनिधित्व" करणार   अशी अपेक्षा व्यक्त कैली जात आहे
(चॊकट)  
*भंडारदरा उशाला तहान राजूरच्या घशाला*
गेली 40 वर्ष आमदार,मंञी आणि विरोधी पक्षनेते..मुळ गाव असलेल्या राजूरला  पिण्याच्या पाण्याची ठणाण बोंब.भंडारदरा उशाशी आणि तहान राजूरच्या घशाशी! दर 4 दिवसांनी पाणी येते.हा विकासपुरूष स्वतःच्या गावाला पाणी पाजू शकत नाही तिथे तालुक्याची व्यथा काय कळणार? हेच यांच्या कथित विकासाचे माॕडेल?

  चौकटः२
*आदीवासींच्या तोंडाला हजार कोटी घोटाळ्याची पानं*
मधुकर पिचड हे राज्याच्या राजकारणात वजनदार शासक म्हणून परिचीत होते आणि आहेत.अनेक खात्यांचे मंञी म्हणून काम करीत असतांना त्यांना आदीवासी विकास मंञालयातही काम करण्याची संधी त्यांना मिळाली होती.९ हजार कोटीची तरतूद असलेल्या या मंञालयाच्या माध्यमातून आदीवासींच्या तोंडाला विकासाची कागदी पानं पुसण्याचा प्रमाद या काळात झाला.याच कालावधीत आदीवासी विभागात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याची चर्चा आजही आहे.आदीवासींच्या पदरात त्यांच्या हक्काच्या विकासाच दान टाकण्याऐवजी कथीत मसिहाने स्वतःच्या कुटूंबियांचा आणि तालुक्याच्या पुर्व भागातील काही सवर्णांचा  आप्तस्कीयांच्या नात्याने विकास केला.नाशिक जिल्ह्यातील पेट्रोलपंप,इगतपूरी तालुक्यातील आदीवासी जमीनी खरेदीवर पिकवलेली हळद हीच यांच्या विकासाची व्याख्या आहे.आणि हा विकास अजिर्ण होऊ नये म्हणूनच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपवासी झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.

चौकटः३

*धनगर समाजाचा द्वेष*
स्वतः आदीवासींच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या या लोकप्रतिनिधीने धनगर समाजाचाही तितकाच द्वेष केला.जेंव्हा धनगर बांधवांना आरक्षण देण्याचा मुद्दा ऐरणीवर आला तेंव्हा पिचड यांनीच धनगर समाजाला आरक्षण समाजाला आराक्षण मिळणार नाही अशी व्यवस्था करणारी वक्तव्य करून शासन प्राशासनाची दिशाभूल केली.तेंव्हापासून धनगरद्वेषी म्हणून पिचड यांची महाराष्ट्राला ओळख आहे.