Breaking News

JNU मध्ये नवा वाद: मुलांच्या हॉस्टेलवर जाण्यास मुलींना बंदी

JNU
नवी दिल्ली
राजधानी दिल्लीतलं जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी गछण आणि वाद हे समिकरण हे काही नवं नाही. आता नवा वाद निर्माण झाला असून प्रशासन लागू करणार असलेल्या नव्या नियमांना विद्यार्थ्यांनी विरोध करण्याचा निर्णय घेतलाय. मोकळेपणा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र ही गछणची ओळख आहे. त्यामुळे मुला मुलींवर कुठलेही बंधनं घालू देणार नाह अशी विद्यार्थी संघटनांची भूमिका आहे. नव्य नयमांनुसार मुलींना रात्री 10 नंतर मुलांच्या हॉस्टेलमध्ये जाण्यास बंदी घालण्यात आलीय. तर मुलींसाठी नवा ड्रेसकोडली लागू करण्यात येणार आहे. या नव्या नियमावलीचं काम सुरू असून त्याचा पहिला ड्राफ्ट तयार करण्यात आलाय. मुलींना आता रात्री साडे अकराच्या आतच प्रवेश दिला जाणार असून रात्री उशीरा प्रवेशास आणि बाहेर जाण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

त्याचबरोबर परिसरात वावरताना आणि कॅन्टिनमध्ये कुठले कपडे घालावे यासाठीही नियमावली केली जाणार आहे.सध्या मुलांना किंवा मुलींना एकमेकांच्या हॉस्टेलवर जाण्यास कुठलीही आडकाठी नाही. त्याचबरोबर ड्रेस कोडही नाही त्यामुळे गछणत अतिशय मोकळं वातावरण असून सर्वच देशातल्या तरूणांना त्याचं आकर्षण असतं. या मोकळेपणाच्या अनेक गोष्टी बाहेर चर्चेला जात असतात.

इथल्या विद्यार्थी संघटनांवर गेली अनेक वर्ष हे डाव्या संघटनांचं वर्चस्व आहे. त्यामुळे आंदोलनं, संप, विरोध अशा अनेक गोष्टींसाठी गछणचं नाव देशभर चर्चेत असतं. काही वर्षांपूर्वी झालेल्या कार्यक्रमात देशविरोधी नार्‍यांमुळे गछणची पुन्हा देशभर चर्चा सुरू झाली. आता या नव्या नियमांना डाव्या विद्यार्थीसंघटनांनी तीव्र विरोध करण्याचा निर्णय घेतलाय.