Breaking News

पाकला 10 गड्यांनी धूळ चारून ऑस्ट्रेलियाने रचला इतिहास

पर्थ
यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तान विरुध्दची 3 सामन्यांच्या टी-20 मालिका 2-0 ने जिंकली. तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टी-20 क्रिकेटमध्ये अव्वलस्थानी असलेल्या पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव केला. दरम्यान, 2019 या वर्षात ऑस्ट्रेलियाच्या संघाने अद्याप एकही टी-20 सामना गमावलेला नाही. तसेच ऑस्ट्रेलियाने तब्बल 12 वर्षानंतर विरोधी संघावर 10 गडी राखून मात केली आहे. दुसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या वेगवान मार्‍यासमोर पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्कारली. प्रथम फलंदाजी करणारा पाकिस्तानचा संघ 107 धावांवर आटोपला. तेव्हा ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (48) आणि अ‍ॅरोन फिंच (52) यांनी नाबाद भागिदारी रचत संघाला विजय मिळवून दिला. 2019 पाकिस्तान विरुध्दची टी-20 मालिका जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा विजयी संघ. महत्वाची बाब म्हणजे, ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल 12 वर्षानंतर 10 गडी राखून विजय मिळवला आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2007 सालच्या टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेविरुध्दचा सामना 10 गडी राखून जिंकला होता. या सामन्यात सलामीवीर कर्णधार अ‍ॅरोन फिंचच्या नेतृत्वात खेळताना मॅथ्यू हेडन आणि अ‍ॅडम गिलक्रिस्ट यांनी संघाला विजय मिळवून दिला होता. या सामन्यात लंकेने दिलेले 102 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने बिनबाद 10.2 षटकात पूर्ण केले होते.कर्णधार अ‍ॅरोन फिंचच्या मार्गदर्शनात खेळताना ऑस्ट्रेलियाच्या संघाने 2019 मध्ये अद्याप 8 सामने जिंकले आहेत. 2010 नंतर ऑस्ट्रेलिया संघाचे हे सर्वोत्तम प्रदर्शन ठरले आहे. 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया संघाने 8 टी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी 7 जिंकले आहेत एक सामन्याचा निकाल लागू शकलेला नाही.