Breaking News

शिवसैनिकाला रामाचं आणि अयोध्येचं नाव घेण्यासाठी आता 10 जनपथावर नाक रगडावं लागेल’: गिरीराज सिंह

Giriraj Singh
नवी दिल्ली
विधानसभा निवडणुकांमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तीन वेगवेगळ्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी अशा नावाने संसार थाटला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हा ऐतिहासिक आणि भव्यदिव्य शपथविधीसोहळा महाराष्ट्राच्या जनतेने ’याचि देही याचि डोळा’ पाहिला. या संपूर्ण सत्तासंघर्षामध्ये सगळ्यात जास्त बहूमत असतानाही भाजपला विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी लागली. त्यामुळे आता महाविकासआघाडीला तोंडावर पाडण्यासाठी भाजप नेते आक्रमक पाहायला मिळतात.
महाविकासआघाडीच्या या घरोब्यावर भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी घणाघाती टीका केली आहे. आता शिवसैनिकांना प्रभू रामाचं आणि अयोध्याचं नाव घेण्यासाठी सोनिया गांधी यांच्या निवास्थानी म्हणजे 10 जनपथवर नाक रगडावं लागणार अशा शब्दात गिरीराज यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. यासंबंधी गिरीराज यांनी सोशल मीडियावर ट्वीटही केलं आहे. खरंतर गिरीराज यांचं हे ट्वीट शिवसेनेला किती झोंबतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.