Breaking News

सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्रिपुरारी पौर्णिमा पासून यात्रेना सुरवात मंगळवार 12/11/2019 रोजी कुर्ली देवीच्या यात्रेने प्रारंभ

माथेरान
यात्रा या शब्दातच एक मूळ गर्भित अर्थ जडला आहे. यात्रा म्हणजे अर्थातच येत रहा, गावकीच्या देवाच्या चरणी, कुलदैवतच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वर्षातून एकदा तरी आपल्या व्यवसायाला पूर्णविराम देऊन एकोप्याने, समुदायाने मनोभावे पूजा अर्चा करून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी जी धडपड सुरू असते, तो सुवर्णमय दिन म्हणजे यात्रा.
नोव्हेंबर महिन्यापासून राज्यातील विविध ठिकाणी या यात्रांना सुरुवात होते. त्यातच जिथे कोकण वासीय समाजाचे अधिक वास्तव्य आहे त्या कोकण किनारपट्टी भागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावा मध्ये त्रिपुरारी पौर्णिमा पासून यात्रेना सुरवात होत असते, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुर्ली देवीच्या यात्रेना  खर्‍या अर्थाने  सुरवात होत असते
यावेळी कुर्ली देवीची यात्रा मंगळवार दिनांक 12/11/2019 रोजी होत आहे संपूर्ण जिल्यातील अस्पृश्यतता न मानणारी जिल्यातील एकमेव यात्रा आहे, कुर्ली देवीची यात्रा ही केवळ भक्तांची यात्रा असते. दिवसभर  मक्त  आणि मक्त भक्तीमय वातावरणात पूजाअर्चा, नवस, देणे. महिलां देवीची ओटी भरणे  मग्न असतात.मंदिर सिमतीचे योग्य नियोजन, कार्यकर्त्यांची मेहनत, भाविकांची शिस्तबद्धता त्या मुळे येथे कोणतेही गैर प्रकार होत नाही, त्रिपुरारी पौर्णिमाच्या चंद्राच्या प्रकाशाने अंधाराचा आसमंत उजाळून टाकणारा दिव्याचा  प्रेरणादायी दीपोत्सव भाविकांच्या जीवनात आनंद घेऊन येते. त्यामुळेच प्रत्येक चाकरमानी आपले कामधंदा व्यवसाय बाजूला ठेवून यात्रेच्या वेळी आपसूकच गावाच्या दिशेने मार्गस्थ होत असतात आणि याच यात्रेत जुन्या आणि नवीन िमत्रांना भेटून आपली सुखदुःख वाटत असतात.