Breaking News

इस्त्रो बुधवारी करणार 14 उपग्रहांचे प्रक्षेपण

चेन्नई
आंध्र प्रदेशच्या श्रीहरिकोटा प्रक्षेपण केंद्रावरून इस्रो (भारतीय अवकाश संशोधन संस्था) बुधवारी 27 नोव्हेंबरला 27 मिनिटात 14 उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे. हे प्रक्षेपण पीएसएलवी (पोलर सैटेलाइट लॉन्च व्हीकल) रॉकेटने करण्यात येईल. यात भारताचा 1625 किलोचा काटोर्सैट - 3 आणि अमेरिकेचे 13 लहान उपग्रहांचा समावेश आहे.
यासाठी अमेरिका इस्रोच्या नव्या व्यापारिक न्यूस्पेस इंडिया लिमिटेडला खर्च देईल. काटोर्सैट- 3 हा उपग्रह 5 वर्ष काम करेल. अंतरिक्षात गेल्यानंतर सर्वात आधी काटोर्सैट- 3 केवळ 17 मिनिटात अंतरिक्षाच्या कक्षेत स्थापित करण्यात येईल. काटोर्सैट- 3 बाबत दिलेल्या माहितीत इस्रोने म्हटले आहे की, हा तिसर्‍या पिढीचा प्रगत उपग्रह आहे. हा ‘हाई रिजोल्यूशन इमेजिंग की क्षमते’चा आहे. याचा उपयोग शहरी नियोजन, ग्रामीण संसाधन आणि मूलभूत विकास आराखडा, तटीय भूमी उपयोग याबाबत छायाचित्र घेण्यासाठी याचा वापर करण्यात येईल. काटोर्सैट - 3 अंतरिक्षात स्थापन केल्यानंतर 1 मिनिटानंतर अमेरिकेचे 13 उपग्रह अंतरिक्षात स्थापित करण्यात येतील. रॉकेटचे प्रक्षेपण झाल्यानंतर 26 मिनिट आणि 50 सेकंदात शेवटला, 14 वा उपग्रह अंतरिक्षात स्थापित होईल.