Breaking News

भारतीय लष्कराच्या 185 सैनिकांनी घेतली देशनिष्ठेची शपथ

अहमदनगर
भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फट्री रेजिमेंट सेंटर अर्थात एमआयआरसीत कठीण परिश्रम व कठोर मेहनतीच्या आधारे 36 आठवड्याचे प्रशिक्षण पूर्ण करून भारतीय सैन्यात प्रवेश करण्या साठी तयार झालेल्या जवानांच्या 426 व्या तुकडीतील 185 सैनिकांनी शानदार समारंभात देशसेवेची शपथ घेतली भारतीय सेना के सेंट्रल कमान के जीओसी इन चीफ तथा कर्नल आफ द रेजिमेंट ब्रिगेड आफ दि गार्डस लेफ्टनंट जनरल इकरूपसिंह घुमन यांनी या शानदार परेडचे निरीक्षण केले.
अहमदनगर मध्ये असलेल्या भारतीय लष्कराच्या मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंट सेंटर अर्थात एमआयआरसी तील अखौरा ड्रील मैदानावर शनिवारी सकाळी आयोजित दीक्षांत समारंभात प्रशिक्षण पूर्ण करणार्या 185 जवानांनी शानदार परेड करून -लेफ्टनंट जनरल इकरूपसिंह घुमन यांना मानवंदना दिली. एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. एस. राणा, डेप्युटी कमांडंट कर्नल रसेल डिसुजा, ट्रेनिंग बटालियन चे कमांडिंग ऑफिसर कर्नल विनायक शर्मा यांच्यासहीत लष्कराचे वरिष्ठ अधिकारी व शपथग्रहण करणार्‍या रिक्रुट जवानांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या दीक्षांत परेड समारंभाकरिता विशेष अतिथी म्हणून मरणोत्तर शौर्यचक्र देण्यात आलेले लष्कराचे शहीद हवालदार बनेसिंग गुज्जर यांच्या वीरपत्नी मनभरदेवी व मरणोत्तर सेनापदक प्रदान करण्यात आलेले शहीद जयसिंग बोरा यांच्या वीरपत्नी मनुमती बोरा उपस्थित होत्या. दीक्षांत परेड नंतर एका छोटेखानी समारंभात दोन्ही वीर नारींचा विशेष सन्मान करण्यात आला. त्यानंतर परेड कमांडर मेजर अनुरागकुमार गुप्ता यांच्या आदेशानुसार लष्करी प्रथेप्रमाणे विविध धर्म गुरूंनी परेड मैदानात आणलेल्या भगवत गीता, गुरूग्रंथ साहिब, कुराण शरीफ, बायबल सारख्या आपापल्या पवित्र धर्मग्रंथांवर हात ठेवून देशसेवेची शपथ घेतली. लेफ्टनंट जनरल इकरूपसिंह घुमन यांच्या हस्ते दीक्षांत परेडच्या आजच्या तुकडीमधील सर्वोत्कृष्ट रिक्रुट साठीचे जनरल सुंदरजी सुवर्ण पदक रिक्रुट मारूत मिश्रा यांना, जनरल डिसुजा रजत पदक रिक्रुट पिंड्राला राजू याला तसेच रिक्रुट रोहित कुमार यांना जनरल पंकज जोशी कांस्य पदक देऊन तसेच रिक्रुट दिलप्रितसिंह याना बेस्ट ड्रिल कॅडेट चे पदक देऊन गौैरविण्यात आले. दीक्षांत परेड नंतर आयोजित एका छोटेखानी समारंभात प्रशिक्षण पूर्ण करून सेनेत दाखल होणार्‍या या युवा सैनिकांच्या माता-पित्यांना लेफ्टनंट जनरल इकरूपसिंह घुमन यांच्या हस्ते विशेष गौरव पदक प्रदान करून गौैरविण्यात आले. खडतर प्रशिक्षण पूर्ण करून शपथग्रहण करणार्‍या या सर्व नौैजवान सैनिकांना आपल्या युनिटमध्ये जाण्यापूर्वी अ‍ॅडव्हान्स तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.