Breaking News

राज्यात पुन्हा 1995 चा फॉर्म्युला; राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग

मुंबई
राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक आणि ठामपणे मुख्यमंत्री आमचाच होणार असा दावा केला आहे. त्याच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेत राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. पवारांच्या या भेटीमुळे राज्यात नवे सत्तासमीकरण तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये राष्ट्रवादी सहभागी होण्यास तयार आहे. अशा परिस्थितीत काँग्रेस अशा सरकारला बाहेरून पाठिंबा देऊ शकते. अर्थात यासाठी शिवसेना आणि भाजप यांची महायुती संपुष्ठात आली पाहिजे.