Breaking News

पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन केंद्र प्रवेशाची मुदत 20 नोव्हेंबरपर्यंत

पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त अध्ययन प्रशालेच्या (ओपन लर्निंग स्कूल) विविध अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी उत्तम प्रतिसाद लाभला असून, प्रवेश घेण्याची मुदत आणखी आता 20 नोव्हेंबर 2019 पर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यासाठी इच्छुकांनीwww.unipune.ac.in/sol या वेबसाईटवर नोंद करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
विद्यापीठाने या वर्षापासून मुक्त अध्ययन प्रशालेमार्फत विविध अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आतापर्यंत 7200 हून अधिक जमांना प्रत्यक्ष प्रवेश घेतले आहेत. त्यात मुख्यत: एम.कॉम, बॉ.कॉम, एम.ए., बी.ए. अशा अभ्यासक्रमांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. ही मुदत वाढवल्यामुळे आता आणखी विद्यार्थी, नागरिक याचा लाभ घेऊ शकतील, अशी माहिती मुक्त अध्ययन प्रशालेचे संचालक डॉ. संजीव सोनावणे यांनी दिली. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. ते विद्यापीठाने नेमून दिलेल्या केद्रांवर लवकरच सुरू होईल, असेही डॉ. सोनावणे यांनी सांगितले.