Breaking News

व्यापमं प्रकरणी 30 आरोपींना सात वर्षांची शिक्षा तर एकाला 10 वर्षांचा कारावास

vyapam
मध्य प्रदेश
मध्यप्रदेशांतील बहुचर्चित व्यापत घोटाळयांतील आरोपींना सोमवारी सीबीआय न्यायालयाने शिक्षा सुनावणी. यातील 30 आरोपींना सात वर्षांची कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर एका आरोपींला 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयाने 2013 मधील व्यापम पोलीस भरती प्रकरणातील विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व 31 आरोपींना 21 नोव्हेंबरला दोषी ठरवले होते.
या दोषी आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. सीबीआयने 31 आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले होते असून सर्व आरोपी जामिनावर तुरुंगाबाहेर होते त्यांना 21 नोव्हेंबरला निकालानंतर कोठडीत पाठविण्यात आले. न्यायालयाने आज 31 जणांना शिक्षा सुनावली असून या घोटाळ्याचा सूत्रधार प्रदीप त्यागीला 10 वर्षांचा कारावास तर उर्वरित 30 आरोपींना 7 वर्षांचा तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यातील आरोपी अनिल यादव राहणार - प्रयागराज (उत्तर प्रदेश), अजय सिकरवार राहणार - मुरैना, धर्मेश सिंह राहणार - आग्रा (उत्तर प्रदेश), फूलकुंवर सिंह राहणार - मुरादाबाद (उत्तर प्रदेश), देवेंद्र यादव राहणार - झांसी (उत्तर प्रदेश), अजीत चौधरी राहणार - मथुरा (उत्तर प्रदेश), भूपेंद्र सिंह राहणार - मुरैना, सतीश शर्मा राहणार - मुरैना, चंद्रपाल कश्यप राहणार - फरुखाबाद (उत्तर प्रदेश), राहुल पांडे राहणार - वाराणसी (उत्तर प्रदेश), आशी कुमार पांडे राहणार - मिर्जापुर (उत्तर प्रदेश), कुलविजय वर्मा राहणार - बाराबंकी (उत्तर प्रदेश), मुकेश सिंह गुर्जर राहणार - ग्वालियर, अस्र्ण गुर्जर राहणार - ग्वालियर, उदयभान सिंह राहणार - ग्वालियर, दिनेश धाकड़ राहणार - मुरैना, अतेंद्र सिंह राहणार - भिंड, परवेंद्र सिंह राहणार - मुरैना, सुदीप शर्मा राहणार - भिंड, अजय प्रताप सिंह राहणार - मुरैना, कलियान सिंह राहणार - मुरैना, गुलवीर सिंह राहणार - मथुरा (उत्तर प्रदेश), राजवीर सिंह राहणार - मुरैना आणि निवास जाटव राहणार - मुरैना, अभिषेक कटियार राहणार - फस्र्खाबाद (उत्तर प्रदेश), सुयश सक्सेना राहणार - काशीराम नगर (उत्तर प्रदेश), प्रभाकर शर्मा राहणार - मुरैना, प्रदीप त्यागी राहणार- मुरैना, नीरज मिश्रा राहणार - प्रयागराज (उत्तर प्रदेश),पंजाब सिंह जाटव राहणार - मुरैना, शिवशंकर राहणार - मिर्जापुर (उत्तर प्रदेश) यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देणे, सरकारी नोकरीमध्ये नियुक्त्या करणे अशा गैरप्रकारांना 2009 पासून सुरुवात झाली. 2013 पर्यंत जवळपास 1020 विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र या सर्वाच्या अर्जाची छाननी केली असता एकाचाही अर्ज आढळून आला नाही, तर याच काळात 1087 अपात्र उमेदवारांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. यामुळे पात्र असलेल्या विद्यार्थ्यांना डावलण्यात आले. तसेच कंत्राटी शिक्षक, अन्ननिरीक्षक, पोलीस हवालदार आणि आयुर्वेदिक वैद्यकीय अधिकार्‍यांचा नियुक्तीसाठीच्या प्रवेश परीक्षेमध्ये गैरव्यवहार करण्यात आले. या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारांबाबत तक्रारी वाढल्यानंतर या घोटाळ्याला 2013 मध्ये वाचा फुटली. इंदोरमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. आनंद राय यांनी हा घोटाळा उजेडात आणला.

काय आहे व्यापम घोटाळा?
मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकर्‍यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेशामधील झालेल्या मोठया गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखले जाते. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) हे खरे नाव असले तरी नावाप्रमाणेच या घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यामध्ये 24 आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित 40 जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठ्या नेत्यांसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली. 2009 मध्ये या घोटाळ्याला सुरुवात झाली होती. 2013 मध्ये या घोटाळ्याला वाचा फुटली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप करण्यात येत होते.