Breaking News

शाळेच्या परिसरातून 50 मीटरपर्यंत जंक फूड हद्दपार


Junk_food
मुंबई
मुलांनी लहानपणापासूनच हेल्थी आणि चांगले खाद्यपदार्थ खावेत याकडे सगळ्यांचाच कल असतो. पण हल्ली जंक फू़डकडे लहान मुलं अधिक आकर्षित होतात. यासाठी अन्न सुरक्षा कायदा अंतर्गत मंगळवारी एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

शालेय मुलांसाठी सुरक्षित खाद्य आणि निरोगी आहार या कायद्यातंर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार, शाळेच्या 50 मीटर आवारत जंक फूडला बंदी केली आहे.

 अन्न सुरक्षा कायद्याच्या अधिकार्‍यांनी सांगितल्यानुार, हा नियम लागू करण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे मुलांसाठी कोणता आहार पुरक आहे आणि कोणता आहार अयोग्य याची योग्य माहिती देणं. तसेच चरबीयुक्त पदार्थ, अतिप्रमाणात मीठ आणि साखर यावर देखील बंदी आणली आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये, मेसमध्ये, हॉस्टेलमध्ये आणि शाळेच्या 50 मीटर आवारात  अशा खाण्यावर बंदी घातली आहे.

तयार केलेला सकस आहार डाएट शाळेने स्विकारायला हवा. शाळेचा आवार हा ’सकस आहार’ म्हणून ओळखला गेला पाहिजे. शाळेच्या आवारात हंगामी आहार आणि स्थानिक खाद्यपदार्थांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे. तसेच खाद्यपदार्थ फुकट घालवण्यावर देखील मज्जाव आणला आहे.