Breaking News

उल्हासनगरात 70व्या संविधान दिन गौरव रॅली संपन्न

उल्हासनगर
 जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून ओळखल्या जाणार्‍या भारत देशाची राज्य घटना, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी, 2 वर्ष 11 महिने, 17 दिवसांत पुर्ण करुन भारत देशाला सुपूद केली तो दिवस 26 नोव्हेंबर 1949 रोजी देशातील नागरिकांना  राज्य घटना बहाल केली असून बुध्द विहार समन्वय समितीच्या वतीने भारतीय संविधान दिवस गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच या रॅलीची सुरुवात सकाळी 7वा बुध्द विहारात  वंदना घेऊन या रैलीची सुरुवात, म्हारळ गाव, शहाड गावठान, चोपडा कोर्ट, उल्हासनगर महापालिका  ते  छत्रपती शिवाजी चौक, 17 सेक्शन,   कल्याण  येथून संविधान रैली काढण्यात आली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेची प्रतिकृती  ठेवून ही मिरवणूक रैलीचा सांगता करण्यात आला तसेच 26 नोव्हेंबर  मुंबई अतिरेकी  हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली या रैली प्रसंगी इंजिनियर  गौतम बस्ते, डॉ. कमलिनी बस्ते, नविन गायकवाड , भुपेश  जाधव, अनिल बागूल, दशरथ बाविस्कर, विकी धीवरे, मीनाताई गायकवाड, भारतीय बौध्द महासभा उल्हासनगर तालुका  अध्यक्ष अशोक एफ शिरसाट, कोषाध्यक्ष पि. एन. पंडित, उपाध्यक्ष दिलीप शिंदे, राजेश थोरात, रोशन पगारे, भास्कर  सरोदे, सुशिलाताई सोनवणे, प्रकाश  कांबळे, शशिकांत अंढागळे, माजी अध्यक्ष  प्रकाश जाधव, शाम भिंगारदिवे,  जिवन मोरे, किशोर निकम, चंद्रकांत मोरे, नाना केदार,   अभिमान  म्हस्के,  आदी मान्यवर मोठया  संख्येने उपस्थित  होते.