Breaking News

रुग्णालयाच्या नावाने होणारी 842 झाडांची कत्तल रोखली

वृक्ष प्राधिकरणच्या सदस्यांनी पुढाकार घेत झाडांची कत्तल थांबवली

मुंबई
कांदिवली येथे महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम केले जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामामध्ये 842 झाडांचा अडथळा येत असल्याने ती तोडण्याचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत रुग्णालय बांधले जाणार त्या ठिकाणी ही झाडे नसल्याचे निदर्शनास आणले. त्यामुळे झाडांची होणारी कत्तल रोखल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष व वृक्ष प्राधिकरण सदस्य यशवंत जाधव यांनी दिली.
यावेळी झाडे छाटणीसाठी दिलेले 50 कोटी गेले कुठे? असा प्रश्‍न उपस्थित करत वृक्ष अधिकारी या पदावर नवीन अधिकारी नेमावा, अशी मागणी जाधव यांनी केली.स्थायी समिती अध्यक्ष व वृक्ष प्राधिकरण सदस्य यशवंत जाधवशताब्दी रुग्णालयाच्या जागी सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे. या इमारतीच्या बांधकामात 842 झाडांचा अडथळा ठरत असल्याने प्रशासनाने ही झाडे कापण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, ज्या ठिकाणी इमारतीचे बांधकाम केले जाते आहे, तेथे झाडेच नाहीत. ही झाडे त्याच परिसरात दुसर्‍या ठिकाणी आहे. त्यामुळे इमारतीच्या बांधकामात या झाडांचा अडथळा ठरत नसल्याचे सदस्य यशवंत जाधव यांनी समोर आणले. इमारतीच्या ठिकाणी झाडेच नसताना दुसर्‍या ठिकाणची झाडे दाखवून हा प्रस्ताव आणल्याने सदस्यांनी प्रशासनाला फैलावर घेतले. यंदा मुंबईत 20 हजार झाडे लावली जाणार होती. मात्र, मोकळी जागा नाही, असे कारण सांगून त्यातील 10 हजार झाडे अद्याप लावण्यात आलेली नाही. असे असताना रुग्णालयाच्या नावाखाली प्रस्ताव आणून झाडे कापण्याचा हा प्रशासनाचा डाव असल्याचा आरोप जाधव यांनी केला. इमारत उभी करण्याच्या ठिकाणी झाडे नसताना प्रस्ताव कशासाठी आणला, असा सवालही सद्स्यांनी विचारला. मात्र, प्रशासनाला त्याचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या नावाखाली तब्बल 842 झाडे कापण्याचा प्रशासनाने आणलेला हा प्रस्ताव सदस्यांनी रोखला आहे. प्रशासनाला धरले धारेवरझाडे पुनर्रोपण करण्यासाठी 25 हजार रुपये अनामत रक्कम -झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी पालिकेकडे 6 हजार रुपये अनामत रक्कम ठेवावी लागते. ती 1 लाख रुपये करावी, अशी मागणी शिवसेनेचे सचिन पडवळ यांची होती. मात्र, ही रक्कम 25 हजार रुपये करावी, असा प्रस्ताव यशवंत जाधव यांनी मांडला. त्याला प्राधिकरणाने मंजुरी दिली. यंदा झाडांच्या छाटणीसाठी 50 कोटी रुपये देण्यात आले. मात्र, मुंबईत झाडांची फारशी छाटणी झालेली दिसलीच नाही. मात्र, तरीही कंत्राटदारांची बिले मंजूर कशी करण्यात आली? असा सवाल जाधव यांनी विचारला. 50 कोटी रुपये गेले कुठे? याची चौकशी व्हावी, अशी मागणी वृक्ष प्राधिकरण सदस्य यशवंत जाधव यांनी केली. हेच कंत्राटदार रस्त्यावर दुभाजक लावण्याचे व त्याच प्रकारचे इतरही कामे करतात. अशाच कंत्राटदारांना कामे दिली जात आहेत. कंत्राटदारांची ही मक्तेदारी मोडून इतर कंत्राटदारांना कामे दिली जावीत, अशी मागणीही जाधव यांनी केली. वृक्ष अधिकारी ही दोन्ही पदे एकाच व्यक्तीकडे आहे. त्यामुळे परीरक्षण व इतर कामे समाधानकारक होत नाहीत. दोन्ही कामे अर्धवट राहतात. त्यामुळे ही पदे वेगवेगळी करावी. वृक्ष अधिकार्‍याच्या जागी नवीन अधिकारी नियुक्त करावा, अशी मागणी सदस्यांनी केली.