Breaking News

मोहंमद पैगंबर जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

Madina
अहमदनगर/प्रतिनिधी
मोहंमद पैगंबर यांची जयंती ईद मिलादुन्नबी (झेंडा ईद) म्हणून आज (दि.10) सर्वत्र उत्साहात होणार आहे. या निमित्त शहरातील तख्ती दरवाजा (मीर मुर्तूजा टकटी दरवाजा महल) येथे मोहंमद पैगंबर यांचे पवित्र केस (हजरत बाल) भाविकांच्या दर्शनासाठी शनिवारी खुले करण्यात आले होते.
तसेच यावेळी विविध धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पवित्र केसाचे भाविकांनी दर्शन घेतले. नगरला परंपरेनुसार दरवर्षी फक्त हजरत मोहंमद पैगंबर यांच्या जयंतीदिनीच पवित्र केस दर्शनासाठी खुले करण्यात येतात. याच दिवशी नगर शहरातून झेंड्याची मिरवणूक काढण्यात येऊन ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात आले.
दरवर्षी मोहंमद पैगंबर जयंतीदिनीच पवित्र दर्शनासाठी खुले जातात. यावेळी शहरात आयोजित करण्यात येणार्‍या  विविध कार्यक्रमांत सर्व धर्मीय मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात.