Breaking News

बविआचा महाविकास आघाडीला पाठिंबा

Hitendra Thakur
मुंबई
विधानभवनात बुधवारी नवनिर्वाचित आमदारांना शपथविधी झाला. याआधीच काही अपक्षांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. आता हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीच्या सरकारला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. बविआचे तीनही आमदार महाविकास आघाडीसोबत सत्तेत सहभागी होतील, अशी माहिती हितेंद्र ठाकूर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना दिली. विशेष म्हणजे, राज्यात भाजपा आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपद आणि समान वाटा या वरून संघर्ष सुरू असताना बहुजन विकास आघाडीच्या आमदारांनी काँग्रेसला रामराम करीत भाजपा सरकारला पाठिंबा दर्शवला होता.