Breaking News

दिव्यांगांना मदत करणे हे कर्तव्य: कोल्हे

 
कोपरगाव / ता.प्रतिनिधी

 परमेश्वराने ज्यांना धडधाकट शरीर दिले त्यांनाही दैनंदिन जीवन जगताना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र नियतीच्या फेऱ्यात काहींना अपंगत्व असल्यास त्यांना जीवन जगत असताना पावलोपावली प्रत्येक ठिकाणी संघर्ष करावा लागतो. दिव्यांग व्यक्ती धडधाकट व्यक्तीलाही लाजवेल असे काम करतात ही वस्तुस्थिती आहे. मात्र मानवतेच्या भूमिकेतून प्रत्येकाने दिव्यांगांना मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, असे भावपूर्ण उद्गार संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूसचे विश्वस्त व संजीवनी फाऊंडेशनचे सचिव सुमित कोल्हे यांनी काढले.

 टाकळी येथील दिव्यांग संतू गंगाधर माळी (वय ५०) यांना संजीवनी फाऊंडेशनच्या वतीने सौर उर्जेवर चालणारी स्वयंचलीत तीन चाकी सायकल देण्यात आली. सुमित कोल्हे यांनी टाकळी रोडने प्रवास करताना माळी हे आपल्या तीन चाकी सायकलचे हाताने पॅडल मारताना आढळून आले. त्यांनी लागलीच त्यांना सौर उर्जेवर चालणारी स्वयंचलित सायकल देण्याचे कबूल करून संजीवनी के.बी. पी. पाॅलीटेक्निकच्या विध्यार्थ्यानी बनविलेली सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी सायकल दिली. यावेळी संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिटयूसचे कार्याध्यक्ष नितीन कोल्हे, पाॅलीटेक्निकचे प्राचार्य ए. आर. मिरीकर, अधिकारी प्रकाश जाधव, तांत्रिक मार्गदर्शक प्रा. आय.के.सय्यद, कोपरगाव तालुका दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मुकुंद काळे, अथर्व राऊत उपस्थित होते.