Breaking News

शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेवर न्यायालयाकडून चिंता

मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवाजी पार्क म्हणजेच ’शिवतिर्था’वर 28 नोव्हेंबरला शपथविधी पार पडणार आहे. मात्र ’शिवतिर्था’वर  होणार्‍या शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेवर मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे.
मैदानात 4 ते 5 लाख लोक उपस्थित राहतील तर मैदानाचं काय होईल याची कल्पना करा. आम्ही उद्याच्या कार्यक्रमाबद्दल काहीही म्हणणार नाही मात्र यापुढे सार्वजिनक मैदानांवर अशा प्रकारच्या कार्यक्रमांचा पायंडा पडू नये. नाहीतर भविष्यात अशाप्रकारच्या कार्यक्रमांसाठी सार्वजनिक मैदानांचा सर्रास वापर होईल, असं सांगत कोर्टाने सुरक्षेबाबतची चिंताही व्यक्त केली. न्यायापूर्ती एस. सी. धर्माधिकारी आणि न्यायामूर्ती आर. आय. छागला यांच्या खंडपीठाने ही चिंता व्यक्त केली.  शिवाजीपार्कवर यापुढे 6 डिसेंबर, 1 मे आणि 26 जानेवारी या तीन दिवशीच कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.  2010 साली दाखल केलेल्या  याचिकेच्या सुनावणीदरम्यानं शपथविधी सोहळ्याच्या सुरक्षेवर मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरे हे गुरुवारी संध्याकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दादर येथील शिवाजीपार्कवर मंडप आणि स्टेज बांधण्याचे काम सुरु आहे. उद्या दुपारी 12 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.