Breaking News

रविवारी व्हाॅलीबाॅल संघाची निवड चाचणी

अहमदनगर/प्रतिनिधी

 अहमदनगर जिल्हा व्हाॅलीबाॅल असोसिएशनच्या वतीने 16 व 18 वर्षाखालील मुले व मुलींच्या व्हाॅलीबाॅल निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि.२४) सकाळी 10 वाजता जिल्हा क्रीडा संकुल, वाडिया पार्क, अहमदनगर येथे निवड चाचणी होणार आहे. अशी माहिती जिल्हा व्हाॅलीबाॅल संघटनेचे सचिव प्रा.एल.बी.म्हस्के यांनी दिली.

 निवड झालेले खेळाडू पुणे विभागीय स्पर्धेमध्ये अहमदनगर जिल्हा संघाचे नेतृत्व करणार आहेत. तरी स्पर्धेसाठी खेळाडूंची जन्मतारीख 16 वर्षाखालील मुले व मुलींसाठी 1/1/2004 व 18 वर्षाआतील मुले व मुलींची 1/1/2002 किंवा त्यानंतरची असावी. खेळाडूंनी सोबत 10 वी पासचे बोर्ड प्रमाणपत्र व आधार कार्ड बरोबर आणावे. तरी अहमदनगर जिल्हयातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन अहमदनगर जिल्हा व्हाॅलीबाॅल असोसिएशनचे अध्यक्ष प्रसाद तनपुरे, प्रा.रमेश मोरगावकर, शैलेश गवळी, प्रा.संजय अनभुले, प्रा.बबनराव झावरे आदिंनी केले आहे.